About Us

नमस्कार मित्रानो, aaplinaukri.in (आपली नोकरी) या पोर्टलवर आपले स्वागत आहे!

aaplinaukri.in हे एक विश्वसनीय आणि लोकप्रिय जॉब पोर्टल आहे, ज्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींची अचूक माहिती वेळेवर पोहोचवणे हा आहे.

आम्ही कोण आहोत?

मी गणेश गायकवाड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील  येथील ‘चॉईस कॉम्प्युटर’ (Choice Computer) आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांचा संचालक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा पुरवत आहोत. डिजिटल युगात नोकरीची माहिती शोधताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी आम्ही या वेबसाईटची सुरुवात केली आहे.

आम्ही काय करतो?

आमच्या या पोर्टलवर तुम्हाला खालील विषयांची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती मिळेल:

  • राज्य सरकार भरती: (उदा. पोलीस भरती, आरोग्य विभाग, तलाठी भरती इ.)

  • केंद्र सरकार भरती: (उदा. रेल्वे, SSC, बँकिंग, सैन्य भरती इ.)

  • प्रवेशपत्र (Admit Card) आणि निकाल (Results)

  • शासकीय योजना: सर्वसामान्यांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना.

आमचे वैशिष्ट्य

आम्ही केवळ माहिती शेअर करत नाही, तर ती अधिकृत जाहिरातीवरून पडताळून मगच सोप्या मराठी भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. ‘चॉईस कॉम्प्युटर’च्या माध्यमातून तांत्रिक क्षेत्रात असलेल्या आमच्या अनुभवाचा फायदा आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देत आहोत.

error: Content is protected !!